भुसावळात उद्या पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा’ उपक्रम
भुसावळ : महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजूंसाठी एक हात मदतीचा रविवारी राबवण्यात येत आहे. मोटू शोभराज चौकातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सायंकाळी पाच वाजता गरजू कुटूंबियांना किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे.
विविध पदाधिकार्यांची राहणार उपस्थिती
एक हात मदतीचा उपक्रम उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रविंद्रजी मिर्लेकर, रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर, सहसंपर्कप्रमुख माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, भुसावळ विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश राणे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तमराव सुरवाडे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, उपतालुकाप्रमुख मनोहर बारसे, उत्तर विभाग शहरप्रमुख निलेश महाजन, दक्षिण विभाग शहरप्रमुख बबलू बर्हाटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, महिला आघाडी जिल्हा संघटक पूनम बर्हाटे, महिला आघाडी तालुका संघटक भूरा चव्हाण, प्रतिभा दुसाने, युवासेना जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख विनोद गायकवाड, युवा सेना तालुका युवा अधिकारी हेमंत बर्हाटे, युवासेना शहर युवाअधिकारी सूरज पाटील, रेल कामगार सेना मंडल अध्यक्ष ललित मुथा, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख नितीन देशमुख, तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, शहरप्रमुख मनोज पवार, अल्पसंख्यांक आघाडी शहरप्रमुख मेहमूब शेख व एस.टी.कामगार सेना पदाधिकारी, दिव्यांग सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कट्टर शिवसैनिकाचा उपक्रम
भुसावळ शहरातील आज- माजी लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, सर्व अंगीकृत संघटना पदाधिकार्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक आयोजक उमाकांत शर्मा (नमा) यांनी केले आहे.







