बहिणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढणार्‍या तरुणाची कुर्‍हाडीने घाव घालून हत्या


नवी दिल्ली : बहिणीचा अंघोळ करतानाच व्हिडिओ काढून तो व्हायरलची धमकी देत तरुणीच्या भावाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागणार्‍याची कुर्‍हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

मृतदेहाची ओळख पटताच उघडकीस आले गुपित
कानपूरच्या चौबेपूर भागात बुधवारी सकाळी ताराचंदचा मृतदेह एका शेतात आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली, तेव्हा समजलं की, तरूण महाराजपूरचा राहणारा आहे. एक दिवसाआधी तो चौबेपूरमध्ये राहणार्‍या हर्षितसोबत दिसला होता. पोलिसांनी जेव्हा हर्षितची चौकशी केली तेव्हा त्याने सगळं सांगितलं. पोलिसांनी हत्येप्रकरणी त्याचा मित्र शोभित यालाही अटक केली.

कुर्‍हाडीचे घाव घालत केली हत्या
हर्षितने पोलिसांना सांगितलं की, काही दिवसांपूर्वी माझा वाढदिवस होता. ताराचंद माझ्या आत्याचा मुलगा होता, त्यामुळे त्यालाही बोलवलं. वाढदिवसाच्या दुसर्‍या दिवशी ताराचंदने माझ्या बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला होता. त्याने मला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दारू पिण्यासाठी पैसे मागितले. बहिणीचा व्हिडीओ बघून मी संतापलो. मी आधी 200 रूपयांची कुर्‍हाड खरेदी केली आणि त्याला दारू पाजली. मंगळवारी हनुमान मंदिरात उत्सव होता. त्याला सोबत घेऊन गेलो आणि मित्र शोभितसोबत मिळून त्याला कापून फेकलं.

दोन्ही आरोपींना अटक
याप्रकरणी कानपूरचे एसपी तेज स्वरूप सिंह म्हणाले की, पोलिसांनी हत्येत सहभागी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हर्षितने रागाच्या भरात त्याची हत्या केली. छेडछाड प्रकरणाचीही चौकशी केली जात आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

 


कॉपी करू नका.