वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट : तिघे कामगार जखमी


वरणगाव : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास स्फोट तिघे कर्मचारी भाजल्याची घटना घडल्याने कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली. जखमी कर्मचार्‍यांना जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आले असून तिघाही कर्मचार्‍यांचे चेहरे भाजले आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अचानक सेक्टर तीनमधील ट्रेसर विभागात स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटात नितीन पाटील, सचिन सपकाळे, गणेश धांडे हे तिघे कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. तिघाही कर्मचार्‍यांचे चेहरे भाजल्याचे समजते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !