शिरपूर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह सहा.अभियंताही एसीबीच्या जाळ्यात


71 हजारांची लाच भोवली : धुळे एसीबीची दमदार कारवाई

शिरपूर : इलेक्ट्रिक ठेकेदाराचे नवीन कामाचे इस्टिमेट मंजूर करून जुन्या झालेल्या कामाचे मोबदला म्हणून 71 हजारांच्या लाचेची मागणी करणार्‍या शिरपूर उपविभागाचे वर्ग एकचे उप कार्यकारी अभियंता सुदर्शन गुलाबराव साळुंखे, (52, रा.प्लॉट नं.61, श्रद्धानगर कॉलनी, नकाने रोड, देवपूर, धुळे) तसेच वर्ग दोनचे सहाय्यक अभियंता स्वप्नील अशोक माळी (29, वरूळ कक्ष कार्यालय, ता.शिरपूर जि.धुळे) यांना धुळे एसीबीच्या पथकाने शिरपूरातील कार्यालयात पंचांसमक्ष लाच घेताना शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडल्याने वीज वितरण कंपनीतील लाचखोर अधिकार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रार भोवली : दोघे अभियंते जाळ्यात
शिरपूर तालुक्यातील कळमसरेच्या 47 वर्षीय ठेकेदार तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. नवीन कामाचे इस्टिमेट मंजूर करून जुन्या झालेल्या कामाचे मोबदला म्हणून आरोपी सुदर्शन साळुंखे यांनी एक लाख तर स्वप्नील माळी यांनी 30 हजारांची 22 रोजी लाच मागितली. तक्रारदाराला तक्रार द्यायची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली. तडजोडीअंती साळुंखे यांना 50 तर माळी यांना 21 हजार देण्याचे ठरले. पथकाने वीज कंपनीच्या कार्यालयातच आरोपींना लाच स्वीकारताच अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे, प्रकाश झोडगे, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, संदीप कदम आदींच्या पथकाने केली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !