अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात 40 जणांचा मृत्यू


ब्रह्मनाळ दुर्घटनेतील पाच जणांचे मृतदेह सापडले ; पुरामुळे मुख्यमंत्र्यांचा रशिया दौरा रद्द

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी व महापुरामुळे आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे तर ब्रह्मनाळ दुर्घटनेतील बेपत्ता सहा जणांपैकी पाच जणांचे मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले. सांगली, कोल्हापूर भागातील तब्बल 200 रस्ते आणि 94 पूल बंद असल्याने मदत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्टलातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली. पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रशिया दौरा रद्द केला आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांत पूर परीस्थिती असून, 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत. चार लाख 47 हजार 695 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफच्या 32, एसडीआरफच्या 3, लष्कराच्या 21, नौदलाच्या 41, तटरक्षक दलाची 16 पथके कार्यरत आहेत. 226 बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. पुरामुळे 40 व्यक्तींचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले आहेत, तर 48 जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

रस्ते व वीजपुरवठा सुरू करण्याच्या सूचना
पाणी ओसरताच या रस्त्यांची डागडुजी, सफाई करून तातडीने वाहतूक पूर्वपदावर आणायला हवी. राज्यभरातून मनुष्यबळ आणि संसाधने मागवा, पण तातडीने ट्रान्सफॉर्मर आदींची दुरूस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करावीत. पूरग्रस्त भागातील रस्ते वाहतूक आणि वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.


कॉपी करू नका.