Big Breaking : Elections To 92 Municipal Councils In The State Postponed बिग ब्रेकींग : राज्यातील 92 नगरपरीषदांच्या निवडणुका लांबणीवर


Big Breaking : Elections to 92 Municipal Councils In The State Postponed मुंबई : राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता व 18 ऑगस्ट रोजी निवडणुकीची तारीखही जाहीर झाली होती मात्र या निवडणुका आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर ज्या क्षेत्रात आचारसंहिता जाहीर होती होती ती आपसुकच संपुष्टात आली आहे. याबाबतचे आदेश गुरुवार, 14 जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी काढले आहेत.

ओबीसी आरक्षणानंतर निवडणुका शक्य !
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टात गत मंगळवार, 12 जुलै रोजी महत्त्वाची सुनावणी झाली होती. राज्य सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारी ट्रिपल टेस्ट पूर्ण केली असल्याचे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल न करण्यास सांगितले. त्याशिवाय, नवीन निवडणुका जाहीर न करण्याचे निर्देश दिले होते त्यामुळे दिलेल्या तारखेलाच निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र गुरुवारी निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात निवडणुका पुढे ढकलल्याचे जाहीर केल्याने 18 ऑगस्ट रोजी होणार्‍या निवडणुकीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 19 जुलै रोजी होणार असून या सुनावणीत नेमका काय निर्णय होतो? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. बांठीया आयोगाच्या आधारे ओबीसींना आरक्षण मिळणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

निवडणुका रद्द झालेल्या नगरपरिषदांची जिल्हा व वर्गनिहाय नावे

‘अ’ वर्ग : जळगाव- भुसावळ. पुणे- बारामती. सोलापूर- बार्शी. जालना- जालना. बीड- बीड आणि उस्मानाबाद- उस्मानाबाद.
‘ब’ वर्ग : नाशिक- मनमाड, सिन्नर व येवला. धुळे- दोंडाईचा वरवाडे व शिरपूर वरवाडे. नंदुरबार- शहादा. जळगाव- अमळनेर व चाळीसगाव. अहमदनगर- कोपरगाव, संगमनेर व श्रीरामपूर. पुणे- चाकण व दौंड. सातारा- कराड व फलटण. सांगली- इस्लामपूर व विटा. सोलापूर- अक्कलकोट, पंढरपूर व अकलूज. कोल्हापूर- जयसिंगपूर. औरंगाबाद- कन्नड व पैठण. बीड- अंबेजोगाई, माजलगाव व परळी- वैजनाथ. लातूर- अहमदपूर. अमरावती- अंजनगाव.
‘क’ वर्ग : नाशिक- चांदवड, नांदगाव, सटाणा व भगूर. जळगाव- वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा व यावल. अहमदनगर- जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता व राहुरी. पुणे- राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड व शिरूर. सातारा- म्हसवड, रहिमतपूर व वाई. सांगली- आष्टा, तासगांव व पलूस. सोलापूर- मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा व सांगोला. कोल्हापूर- गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड व वडगांव. औरंगाबाद- गंगापूर व खुलताबाद. जालना- अंबड, भोकरदन व परतूर. बीड- गेवराई व किल्ले धारूर. उस्मानाबाद- भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परांडा व तुळजापूर. लातूर- निलंगा व औसा. अमरावती- दर्यापूर. बुलढाणा- देऊळगावराजा.
नगरपंचायती : अहमदनगर- नेवासा. पुणे- मंचर व माळेगाव बुद्रुक. सोलापूर- अनगर.

फैजपूर शहरात चोरट्यांनी ऑटो पार्टसचे दुकान फोडले 

शिरपूरात गावठी कट्ट्यातून गोळी झाडत तरुणाची आत्महत्या

शिंदे सरकारने बदलला आधीच्या सरकारचा निर्णय : नगराध्यक्षांसह सरपंचांची आता जनतेतून होणार निवड

राज्यातील नागरीकांना मोठा दिलासा : पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !