जानवेनजीक पिस्तुलाच्या धाकावर लूट : चौघा आरोपींचा कसून शोध
पारोळा : पिस्तुलचा धाक दाखवत दुचाकीवरून आलेल्या चौघांनी कार चालकासह चौघांना लुटल्याची घटना मंगळवारी रात्री 10.30 व 11 वाजता जानवेनजीक घडली. आरोपींनी 21 हजार रुपये रोख व चार मोबाईल लांबवत धूम ठोकली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
अमळनेरातून चोरली दुचाकी
पोलिसांच्या चौकशीत जगदीश पुंडलिक पाटील (18, रा.पिंपळकोठा,ता.पारोळा), गौरव विजय पाटील (18, रा.अमळनेर), सागर पाटील (19, रा.अमळनेर) व जगदीश उदय वाघ (20, रा.सांगवी, ता.शिरपूर) हे आरोपी निष्पन्न झाले असून त्यांनी अमळनेरातून एक दुचाकी चोरली आहे. गौरव, सागर व तसेच जगदीश पाटील व जगदीश वाघ हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.





जानवेजवळ पिस्तुलाच्या धाकावर अधिकार्यास लूटले
सागर, गौरव व दोघं जगदीश या चौघांनी मंगळवारी रात्री 11 वाजता जानवेपासून जवळच असलेल्या डांगरगावाजवळ कर अधिकारी विजय सोनवणे यांच्या कारच्या (एम.एच.19 बी.यु.2144) पुढे दोन दुचाकी आडव्या लावल्या. एकाने कारच्या खिडकीची काच खाली करायला लावून चालक दीपक कैलास नांद्रे (रा.धुळे) यांच्यावर पिस्तुल रोखले तर कारमधील व्यंकट गोविंद मेकाले (रा.नेरुळ, मुंबई) व अनिल वळवी (रा.रायपुर, ता.नवापुर, जि.नंदूरबार) यांनाही धमकावत चौघांजवळील 21 हजार रुपये रोख व चार मोबाईल घेऊन पोबारा केला.
