वेल्डींग कारागीराची जळगावात आत्महत्या


A 35-year-old youth in Jalgaon committed suicide by Hanging Himself जळगाव : व्यवसायाने वेल्डींग कारागीर असलेल्या 35 वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील सम्राट नगरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अरविंद देविदास इंगळे (35, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी परीसर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
अरविंद इंगळे हा तरुण आई-वडील, मोठा भाऊ यांच्यासह सम्राट कॉलनीत वास्तव्याला आहे. वेल्डिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. शनिवार, 16 जुलै रोजी रात्री 10 वाजता घरात सर्वजण एकत्र जेवन करून झोपले असता अरविंदने रात्री 12 वाजेच्या सुमारास त्याने घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. हा प्रकार त्याच्या घरच्यांना समजल्यानंतर त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. रविवार, 17 जुलै रोजी सकाळी जिल्हा शायकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत अरविंदच्या पश्चात वडील देविदास झोपा इंगळे, आई रंजना, मोठा भाऊ सुधीर आणि विवाहित बहिण असा परीवार आहे.

अट्टल दुचाकी चोरट्यांचे त्रिकूट भुसावळ शहर पोलिसांच्या जाळ्यात

 


कॉपी करू नका.