Gold Has Become Cheap गृहिणींसाठी सुवर्णसंधी : सोने झाले स्वस्त ; जाणून घ्या नेमके दर
Golden opportunity for housewives : Gold has become cheap ; Know the exact rate जळगाव : सोन्याचा भाव जवळपास वर्षभरातील नीचांकी पातळीवर गेला असून गुरुवारी सोने 259 रुपयांनी स्वस्त झालं आहे त्यामुळे सोन्याचा भाव 50 हजाराच्या खाली आले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही आज 400 रुपयांची घसरण झाली. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीचा परीणाम गुरुवारी भारतीय वायदे बाजारावरही दिसून आला आहे.
सोन्याचा आजचा भाव
मल्टीकमोडिटी एक्सचेंज वर गुरुवारी सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 49 हजार 958 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. याआधी सोन्याचा व्यवहार 50 हजारांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला होता, मात्र मागणी कमी झाल्याने आणि जागतिक बाजारपेठेत झालेली घसरण यामुळे लवकरच वायदेचे भाव 50 हजारांच्या खाली गेले. सोने सध्या त्याच्या आधीच्या बंद किमतीच्या तुलनेत सुमारे 0.5 टक्क्यांनी घसरला आहे.


बंडखोरांपैकी एकही निवडून आला तर राजकारण सोडेल : संजय सावंत
चांदीचा आजचा भाव
सोन्याच्या धर्तीवर आज चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर, चांदीचा भाव सकाळी 480 रुपयांनी घसरून 55,130 रुपयांवर आला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 55,450 रुपयांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला होता, मात्र लवकरच जागतिक बाजाराचा दबाव दिसून येऊ लागला. चांदी सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.88 टक्क्यांनी घसरली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)


