If even one of the rebels gets elected, he will quit politics : Sanjay Sawant बंडखोरांपैकी एकही निवडून आला तर राजकारण सोडेल : संजय सावंत


Take The Elections If you Dare ; Sanjay Sawant At a Gathering In Pachora City पाचोरा : बंडखोर आमदारांपैकी एक जरी आमदार निवडून आला तर राजकारण सोडे शिवाय हिंमत असेल तर सद्यस्थितीत निवडणुका घ्या, असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी येथे केले. बुधवारी जारगाव येथील नाथमंदिरात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा झाला. प्रसंगी सावंत बोलत होते.

यांची होती उपस्थिती
या मेळाव्यास प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, पाचोरा विधानसभा संपर्क प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.अभय पाटील, जि.प.चे माजी सदस्य रावसाहेब पाटील, दीपकसिंग राजपुत, उद्धव मराठे, राजेंद्र साळुंखे, तालुकाप्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, रमेश बाफना, विधानसभा क्षेत्र प्रमुख अविनाश कुडे, माजी नगरसेवक दादा चौधरी, उपस्थित होते.

शिवसेना पक्ष हा न संपणारा विचार
जारगाव येथील नाथमंदिरात आयोजित मेळाव्यात संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या बंडखोर आमदारांविरोधात टिकास्त्र सोडतांना सांगितले की, शिवसेना पक्ष हा एक न संपणारा विचार आहे. जे सोडून गेले ते कावळे आणि जे उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते खरे शिवरायांचे खरे मावळे आहेत. हिम्मत असेल तर सद्यस्थितीत निवडणुका घ्या बंडखोर आमदारांपैकी एक जरी आमदार निवडून आला तर राजकारण सोडेल. बंडखोरांना अडीच वर्षांनंतरच कसे दिवंगत आनंद दिघे आठवले ? सन – 19 जुन 1966 रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष वाढविला. ज्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविलेल्या आमदारांवर मतदारांनी विश्वास ठेवला त्याच आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसले. या बंडखोर आमदारांना आगामी काळात मतदार त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही. असे ते यावेळी म्हणाले.

हवालदाराला स्व.आर.ओ.तात्यांनी राजकारणात आणले
याप्रसंगी शेतकरी सेनेचे तालुक प्रमुख रमेश बाफना यांनी सांगितले की, आ. किशोर पाटील यांना स्व. आर. ओ. पाटील यांचा राजकीय वारसा सांभाळता आला नाही. एक साध्या हवालदाराला स्व. आर. ओ. पाटील यांनी राजकारणात आणले.

यांनी सुनावले बंडखोर आमदारांना खडे बोल
यावेळी जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. अभय पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, अविनाश कुडे, प्रितेश जैन, विलास पाटील, अरुण तांबे, तालुका प्रमुख शरद पाटील यांनी देखील बंडखोर आमदारांविषयी खडे बोल सुनावले.

यांची मेळाव्याला उपस्थिती
मेळाव्यास युवासेना विधानसभा सभा क्षेत्र प्रमुख जितेंद्र पाटील, अनिल सावंत, भैय्या महाजन (नगरदेवळा), आबा देसले (सारोळा), प्रितेश जैन (पिंपळगाव हरेश्वर), देविदास पाटील, भगवान पाटील, किरण बडगुजर, पप्पु जाधव, राजधर माळी, भैय्यासाहेब पाटील (लासुरे), भगवान पांडे (वाडी शेवाळे), धनराज पाटील (वरखेडी) अधिकार पाटील (सांगवी) यांचे सह तालुकाभरातील पदाधिकारी, गट प्रमुख, गण प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलेचा विनयभंग करीत कुटुंबाला धमकावले : जळगावातील पूजार्‍यासह सहा जणांविरोधात गुन्हा


कॉपी करू नका.