Pilot training plane crashes near Indapur : Pilot injured इंधन संपताच विमान कोसळले : महिला वैमानिक जखमी : या शहरातील घटना
Pilot training plane crashes near Indapur : Pilot injured बारामती : इंधन संपल्याने इंदापूर येथील एका शेतामध्ये वैमानिकाला प्रशिक्षण देणारे विमान कोसळल्याची घटना समोर आली असून या अपघातात महिला वैमानिक भाविका राहुल राठोड या जखमी झाल्या आहेत. कोसळलेले विमान पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
इंधन संपताच कोसळले विमान
बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत पायलट प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार आज सोमवारी सकाळी बारामतीतून या विमानाने उड्डाण केले मात्र अचानक विमानातील इंधन संपल्याने ते इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथील बारहाते यांच्या शेतात कोसळले. या अपघातात जखमी झालेल्या भाविका या कार्व्हर एव्हिएशनमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

अधिकार्यांसह पथकाची धाव
ही घटना समजताच शेजारील पोंदकुले वस्तीवरील तरुण त्या ठिकाणी पोचले त्यांनी महिला पायलटला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. या महिला पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बारामती येथील कारवार एव्हिएशनच्या अधिकारी आणि कर्मचार्यांचे पथक दाखल झाले.
Maharashtra | A trainee aircraft crashed in a farm in Kadbanwadi village of Indapur taluka in Pune district today around 11.30 am. A 22-year-old woman pilot injured. pic.twitter.com/XCUYo8xROn
— ANI (@ANI) July 25, 2022
देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी घेतली शपथ