31 lakhs were withdrawn by thieves breaking the ATM of Bodwad State Bank बोदवडला स्टेट बँकेचे एटीएम फोडत चोरट्यांनी 31 लाख लांबवले

दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद : सीसीटीव्हीवर काळा स्प्रे मारत केली धाडसी चोरी


31 lakhs were withdrawn by thieves breaking the ATM of Bodwad State Bank बोदवड : धुळे जिल्ह्यातील फागणेसह कापडणे येथे एटीएम फोडल्याची घटना ताजी असतानाच बोदवड शहरातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरील स्टेट बँकेच्या खालच्या मजल्यावरील एसबीआयचे एटीएम फोडून त्यातील सुमारे 31 लाखा 10 हजारांची रोकड लांबवल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आल्याने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केल्याने चोरटे सराईत असल्याचा अंदाज असून अशा पद्धत्तीने चोरी करणारी टोळी हरीयाणात कार्यरत असल्याने त्याद़ृष्टीनेही तपास सुरू आहे.

गजबजलेल्या भागात चोरी झाल्याने घबराट
बोदवड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील मुक्ताईनगर रस्त्यावर स्टेट बँकेची वर्दळीच्या रस्त्यावर शाखा असून या शाखेला लागूनच एसबीआयचे एटीएम आहे. ग्राहकांची सातत्याने होत असलेली गर्दी पाहता या एटीएममध्ये मोठ्या प्रमाणावर रोकडचा भरला केला जातो मात्र सुरक्षा रक्षक नसल्याची संधी रेकी केलेल्या चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास साधली. सुरुवातीला एटीएमच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्हीला काळा स्प्रे मारत दोन चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करीत सोबत आणलेल्या गॅस कटरच्या सहाय्याने एटीएममधील सुमारे 31 लाख 10 हजारांची रोकड लांबवली.

पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे गॅस कटरद्वारे ज्यावेळी एटीएम मशीनमधून रोकड चोरी होते त्यावेळी मशीन तापल्यानंतर त्याचा संदेश सर्व्हरला जातो त्यामुळे याबाबत अंदाज यंत्रणेला कसा आला नाही? असा प्रश्न आहे शिवाय वर्दळीच्या भागात धाडसी चोरी होत असताना पोलिस यंत्रणेच्या गस्तीबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिस यंत्रणेची घटनास्थळी धाव
एटीएम फोडण्यात आल्याची घटना कळताच बोदवडचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व सहकार्‍यांनी धाव घेतली तसेच जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेतली. जळगाव येथून ठसे तज्ज्ञांसह डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले आहे.

 

खुनाने मालेगाव हादरले : तलवारीचे वार करीत तरुणाचा वादातून खून 

देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी घेतली शपथ 


कॉपी करू नका.