Pretext For Blowing The Horn : A Milk Seller Was Beaten Up By a Trio In Kandari हॉर्न वाजवल्याचे निमित्त : कंडारीत दुध विक्रेत्याला त्रिकूटाकडून मारहाण


Pretext For Blowing The Horn : A Milk Seller Was Beaten Up By a Trio In Kandari जळगाव : हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून दुध विक्रेत्याला तीन जणांनी शिवीगाळ करून विट मारून जखमी केल्याची घटना जळगाव तालुक्यातील कंडारी येथे घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्रिकूटाविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा
गणेश सुभाष जाधव (35, रा.कंडारी, ता. जि.जळगाव) हा तरूण दुध विक्री करतो. रविवार, 24 जुलै रोजी सकाळी 7 वाजता गणेश जाधव हा दुध विक्री करीत असताना त्याने हॉर्न वाजवला व त्याचा राग आल्याने गावात राहणारे सलमान हुसेन पिंजारी (30), इमाम हुसेन पिंजारी (35) आणि जरीनाबी हुसेन पिंजारी (45) यांनी शिवीगाळ करून जमिनीवर पाडले तसेच बाजूला असलेली विट गणेशच्या छातीवर मारून फेकली. यात गणेश जखमी झाला. याप्रकरणी गणेश जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात सलमान हुसेन पिंजारी, इमाम हुसेन पिंजारी, जरीनाबी हुसेन पिंजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय जाधव करीत आहे.


बोदवडला स्टेट बँकेचे एटीएम फोडत चोरट्यांनी 31 लाख लांबवले 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !