मुक्ताईनगर तालुक्यातील गणांचे आरक्षण जाहीर
Reservation of Ganas in Muktainagar taluka announced मुक्ताईनगर : आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण काढण्यात आले. तालुक्यात आठ गण असून सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण लागू करण्याचे निर्देश दिल्याने या अनुषंगाने आता पंचायत समितीसाठी देखील आरक्षण लागू करण्यात आले आहे.
असे आहे गणनिहाय आरक्षण-



हरताळे- एस.टी. सर्वसाधारण
उचंदे- एस.टी. महिला
रूईखेडा- एस.सी.महिला
निमखेडी- नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
अंतुर्ली- सर्वसाधारण महिला
कर्की-सर्वसाधारण महिला
कुर्हा- सर्वसाधारण आणि वढोदा- सर्वसाधारण