Big decision of Supreme Court: Elections in 365 places in the state now without OBC reservation सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय : राज्यातील 365 ठिकाणच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाविनाच


Big decision of Supreme Court: Elections in 365 places in the state now without OBC reservation नवी दिल्ली : राज्यात यापूर्वी जाहीर झालेल्या 365 ठिकाणच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घेण्याचे निर्देद्ध सुप्रीम कोर्टाने दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारचा बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारून लोकसंख्यानिहाय ओबीसी आरक्षण देण्याचा ऐतिहासीक निकाल अलीकडेच दिला होता तसेच 15 दिवसांच्या आत राज्यातील अन्य निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश देतांनाच आधी जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये आरक्षण नसेल असे स्पष्ट केले होते. तथापि, राज्य निवडणूक आयोगाने आधी आरक्षण काढलेल्या नगरपालिका, जिल्हा परीषदा व पंचायत समित्यांमध्ये नव्याने आरक्षण काढण्याची तयारी सुरू केल्याने मात्र यावरून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले आहे.

याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
राज्यातील ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली असून यावर आज सुनावणी झाली. यात सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात 365 ठिकाणी होणारी निवडणूक ही ओबीसी आरक्षणाविना होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर इतर ठिकाणच्या निवडणुका या राज्य सरकारने जाहीर करू नये असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. यामुळे आधी जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नसेल, असे स्पष्ट झाले आहे. तर यामुळे एकूणच गोंधळात भर पडली आहे.

 


कॉपी करू नका.