एक लाखांची मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेला घराबाहेर काढले : पतीसह पाच आरोपींविरोधात गुन्हा
The Married Woman of Chalisgaon Was Trown out Of The House By Her In-Laws For Not Bringing Money चाळीसगाव : एक लाखांच्या मागणीसाठी चाळीसगावातील माहेर व बांबरूड, ता.पाचोरा येथील विवाहितेला घराबाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पैसे न आणल्याने विवाहितेचा छळ
चाळीसगावातील माहेर असलेल्या सविता ज्ञानेश्वर ठाकरे (30) यांचा विवाह बांबरुड, ता.पाचोरा येथील ज्ञानेश्वर भिकन ठाकरे यांच्याशी रितीरिवाजानूसार 2011 मध्ये झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती ज्ञानेश्वर ठाकरे याने विवाहितेला माहेरहून एक लाख रूपये आणावे, अशी मागणी केली परंतु विवाहितेच्या आई-वडिलांची परीस्थिती हालकीची असल्यामुळे मागणी पूर्ण न झाल्याने पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करून अंगावरील सोन्याचे दागिने काढून त्यांना घरातून हाकलून दिले. विवाहिता या चाळीसगावी माहेरी निघून आल्या.



यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी बुधवार, 27 जुलै रोजी दुपारी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पती ज्ञानेश्वर भिकन ठाकरे, सासु कौशल्याबाई भिकन ठाकरे, ननंद ललिता पंडित बागुल (सर्व रा.बांबरुड ता.पाचोरा), दीर पंडित भिकन ठाकरे (रा.नाशिक) आणि नंदोई छोटू शिवराम काकडे (रा. चाळीसगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक मुकेश पाटील करीत आहे.