वढोदा ग्रामपंचायतीच्या सभेत विकासकामांवरून राडा : महिला सरपंचांनी उपसरपंचांना मोबाईल मारून फेकला

सरपंचांच्या तक्रारीवरून उपसरपंचासह तिघांविरोधात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा


In the meeting of Vadoda Gram Panchayat, Rada over development works: Women sarpanchs threw mobile phones at deputy sarpanches मुक्ताईनगर : तालुक्यातील वढोदा ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या मासिक बैठकीत विकासकामांच्या निधीवरून शाब्दीक वाद विकोपाला गेल्याने महिला सरपंचांनी उपसरपंचांना थेट मोबाईल मारून फेकल्याने खळबळ उडाली तर सरपंचांनी आपल्याला जातीवाचक शिविगाळ झाल्याचा आरोप करीत उपसरपंचांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता असून एकाच पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या झालेल्या वादाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

उपसरपंचांना मारून फेकला मोबाईल
गावाच्या विकासासाठी शासनाने पाठविलेला निधी व इस्टीमेटप्रमाणे काम न करता निधी सरपंच स्वप्ना संदीप खिरोळकर व ग्रामसेवक विजय अशोक भिवसाने यांनी हडप केला व बोगस कामे केली, असा आरोप उपसरपंच रंजना हरीदास कोथळकर यांनी करीत जाब विचारला तर काही कामांबाबत माहिती अधिकाराचा अर्ज टाकल्याचा राग अनावर आल्याने सरपंच स्वप्ना संदीप खिरोळकर यांनी उपसरपंच यांना खुर्चीवर उठवत त्यांना मोबाईल मारून फेकला. कोर्‍या प्रोसेडींग बुकावर स्वाक्षर्‍या मागितल्याने त्या देण्यास नकार दिल्याने उपसरपंचांसह त्यांचा मुलगा प्रदीप कोथळकर यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उपसरपंचांनी कुर्‍हा पोलिस दुरक्षेत्रात सरपंचांविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.




मारहाण करीत धमकावले
उपसरपंच वढोदा रंजना कोथळकर म्हणाल्या की, ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या कारभाराच्या विरोधात माहिती अधिकाराचा अर्ज टाकला व पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांसह मुक्ताईनगर तहसीलदार मुक्ताईनगर व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याचा राग आल्याने सरपंच स्वप्ना खिरोळकर यांनी मला मोबाईल मारून फेकला तर ग्रामसेवक विजय भिवसने यांनी मिटिंगमधून निघून जा, असे धमकाविल्याचे कोथळकर यांनी सांगितले.

उपसरपंचांसह तिघांविरोधात गुन्हा
सरपंच स्वप्ना संदीप खिरळकर यांनीदेखील आपणास जातीवाचक शब्दात अश्लील शिविगाळ केल्याप्रकरणी उपसरपंच रंजना हरीदास कोथळकर, यांच्यासह त्यांची मुले प्रदीप हरीदास कोथळकर, विशाल हरीदास कोथळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय : राज्यातील 365 ठिकाणच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाविनाच


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !