सावद्यात ब्राह्मण हितवर्धिनी समितीतर्फे गुणवंतांचा गौरव
सावदा : ब्राह्मण हितवर्धिनी समितीतर्फे गुणवंतांचा गौरव नुकताच दत्त मंदिरात झाला. समितीचे अध्यक्ष बाबा जोशी, पंडितराव गचके, भास्कर कुलकर्णी, सुवर्णा ओवे, सचिन सकळकळे आदींच्या हस्ते दीपप्रज्वालन करण्यात आले. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व बक्षीस देण्यात आले. सार्थक कानडे, समर्थ कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सोहम मटकरी, राधिका गचके, वेदिका जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. बाबा जोशी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. भास्कर कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य देण्याचे आश्वासन दिले. यशस्वीतेसाठी श्रीकांत मटकरी, सुभाष कुलकर्णी, दत्तात्रय कानडे, अनंत कुलकर्णी, समर्थ कुलकर्णी, अनिल कासवेकर, रवींद्र कुलकर्णी, अथर्व जोशी, अपूर्वा कुलकर्णी, रसिका जोशी आदींनी परीश्रम घेतले. आभार माधवी कानडे यांनी मानले.