चाळीसगाव शहरात बकरी ईद उत्साहात


विश्‍वशांतीसाठी दुवा पठण ; हिंदू बांधवांनी दिल्या शुभेच्छा

चाळीसगाव : शहरातील दत्तवाडी स्थित ईदगाह मैदानावर सोमवारी सकाळी साडेआठ वाजता बकरी ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी नमाज पठणानंतर मौलवींनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.

यांची होती उपस्थिती
ईदगाह मैदानावर चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.विनोद कोतकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, अनिल निकम, रमेश शिंपी, डी.वाय.एस.पी.उत्तमराव कडलग, पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड, सहा.निरीक्षक सुरेश शिरसाठ, आशिष रोही यांनी मुस्लिम बांधवाना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी हाजी गफुर पहेलवान, अलाऊद्दीन शेख, अजीज खाटीक, सरदार शेख, असलम मिर्झा, अनिस शेख, छोटु पहेलवान, अनिस मिर्झा, शकिल खाटीक, राजु शेख आदी उपस्थित होते.


कॉपी करू नका.