Two youths of Shirud unfortunately died after falling from seventeen storied building शिरूडच्या दोघा तरुणांचा सतरा मजली ईमारतीवरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू

0

Two youths of Shirud unfortunately died after falling from seventeen storied building अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथील तरुणांचा सुरत शहरात लिप्ट बसवण्याचे काम सुरू असताना सतरा मजली ईमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून पडल्याने दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. ही घटना सुरतच्या पांडेसरा भागात शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनेमुळे शिरूड गावात शोककळा पसरली आहे. निलेश प्रल्हाद पाटील (28) व आकाश सुनील बोरसे (22) अशी मयतांची नावे आहेत.

सीडी सरकल्याने तरुणांचा मृत्यू
अमळनेर तालुक्यातील शिरूड गावातील रहिवासी असलेले निलेश पाटील व आकाश बोरसे हे तरुण रोजगारानिमित्त सुरत येथे कामानिमित्त वास्तव्यास गेले होते. सुरतच्या पांडेसरा भागात प्लॅटिनियम प्लाझा नामक सतरा मजली इमारतीत निलेश प्रल्हाद पाटील (28) व आकाश सुनील बोरसे (22) या त्या ठिकाणी लिफ्ट बसविण्याचे काम करत असताना शुक्रवारी सकाळी कामावर गेल्यानंतर दोघे तरुण एकाच सीडीवर उभे राहून काम करीत असताना सीडी सरकल्याने 17 व्या मजल्यावरून पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. काही कामगारांनी परीसरात काम करणार्‍या कामगारांना ही घटना सांगितली. घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवले. या घटनेने शिरूड गावात शोककळा पसरली आहे.


error: Content is protected !!