बोदवड तहसीलदार नियुक्तीच्या आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

महसूल मंत्र्यांनी दिले आश्वासन : आमदार एकनाथ खडसे यांनी घेतली उपोषणार्थीची भेट : तहसीलदार नियुक्तीकडे लक्ष


End of hunger strike after promise of Bodwad Tehsildar appointment बोदवड : शहरातील तहसील कार्यालयात पूर्णवेळ तहसीलदार मिळण्याच्या मागणीसाठी सरण रचून येवती गावातील प्रमोद धामोडे यांनी तीन दिवसांपासून आमरण उपोषण छेडले होते. मुख्यमंत्री मुक्ताईनगर दौर्‍यावर येत असतानाच हे उपोषण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले होते मात्र त्यानंतरही दखल घेण्यात न आल्याने उपोषणार्थी धामोडे यांनी आश्चर्य व्यक्त करीत नाराजी व्यक्त केली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तहसीलदार नियुक्तीचे आश्वासन यावेळी दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली.

महसूल मंत्र्यांनी दिले तहसीलदार नियुक्तीचे आश्वासन
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी उपोषणार्थीची भेट घेतल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. उपोषणाची कल्पना त्यांना देण्यात आली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लवकरच तहसीलदार नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली. तहसीलमध्ये आता तहसीलदार नियुक्तीकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

तहसीलदारांअभावी नागरीकांचे हाल
बोदवडसह ग्रामीण भागातील विविध समस्यांसाठी नागरीकांना तहसील कार्यालयात कामानिमित्त यावे लागते मात्र पूर्ण वेळ तहसीलदार नसल्याने वृद्ध, अपंग व निराधार नागरीकांना माघावी परतावे लागत असल्याने विविध पक्षांमार्फत तसेच संघटनांमार्फत निवेदने देण्यात येवूनही उपयोग झाला नाही. दरम्यान, उपोषण कर्ते प्रमोद धामोडे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याही प्रकारे उपोषणाची दखल न घेतल्याची खंत यावेळी बोलताना व्यक्त केली.


कॉपी करू नका.