मुंबईतील तरुणीचा जळगावातून भामट्यांनी मोबाईल लांबवला


In Jalgaon, thieves stole a mobile phone from a student’s hand जळगाव : स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नवी मुंबईतून जळगावात आलेल्या तरुणीच्या हातातून चोरट्यांनी महागडा मोबाईल लंपास केला. ही घटना मु.जे.महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलाजवळ घडली. याबाबत मंगळवारी 20 सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

हाताला झटका देवून लांबवला मोबाईल
दर्शना बाळासाहेब कांबडे (21, नवी मुंबई, ह.मु. कुसुमाई मुलींचे वसतीगृह, जळगाव) ही विद्यार्थिनी शहरातील फिनीक्स अ‍ॅकडमी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करते. सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास दर्शना ही तिची मैत्रीण तेजस्विनी बेलकरसोबत जेवण करून वस्तीगृहाकडे एकलव्य संकुलाकडून पायी जात असताना अचानक मागून विना नंबरच्या दुचाकीवर अज्ञात तिघे आले व त्यांनी दर्शनाच्या हाताला झटका देवून 9 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावला. दर्शना ही खाली पडल्याने तिच्या दोन्ही पायाला लागले. याबाबत रामानंदनगर पोलिसात मंगळवारी अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.


कॉपी करू नका.