माळी नगरातून हातमजुराची दुचाकी चोरीला

0

Thieves stole a motorcycle from Avhane Shiwar जळगाव : हात मजुरी करून उदरनिर्वाह करणार्‍या इसमाची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेल्याची बाब आव्हाणे शिवारातील माळी नगरात घडली. मंगळवारी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव तालुका पोलितास गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम
विजय अंबादास लोखंडे (52, सावता माळी नगर, आव्हाणे शिवार, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवार, 19 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी (एम.एच.19 बी.टी.2466) घरासमोर पार्किंगला लावली असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संधी साधली तर मंगळवारी सकाळी आठ वाजता दुचाकी चोरी उघडकीस आली. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेडकॉस्टेबल अनिल तायडे करीत आहे.


error: Content is protected !!