अंकलेश्वर राज्य मार्गावर खड्ड्यांमुळे दुचाकीला अपघात : साक्रीतील दोघे तरुण गंभीर जखमी


Bike accident due to potholes on Ankleshwar State Road : Two youths from Sakri seriously injured यावल : खड्ड्यांमुळे अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील अपघाताची मालिका कायम आहे. किनगाव-चिंचोली दरम्यान अचानक खड्डा समोर आल्याने दुचाकीस्वार एक खड्डा चुकवत दुसर्‍या खड्ड्यात गेला व दुचाकी अनियंत्रीत होताच दोघे रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. जखमींना नागरीकांच्या मदतीने किनगाव आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दोघांवर प्रथमोपचार करून जळगावी हलवण्यात आले.

खड्डे चुकवताना दुचाकी घसरली
अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे किनगावजवळ एका तरुणाचा जीव गेला होता. त्यानंतर पुन्हा बुधवारी रात्री याच रस्त्यावरील चिंचोली-किनगाव दरम्यान रात्री दुचाकी क्रमांक (एम.एच.18 ए.आर. 2740) घेवून जगन नानू धनगर (47) व वसंत धनगर (40, दोघे राहणार साक्री, जि.धुळे) हे येत होते. अचानक समोर आलेले खड्डे पाहून ते घाबरले व एक खड्डा चुकवतांना दुचाकी दुसर्‍या खड्ड्यात जाऊन अनियंत्रित झाली व दोघेही रस्त्यावर कोसळले.

तरुणांवर जळगावात उपचार
या अपघातात यांच्या डोक्याला दुखापत झाली व ते गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यात पडून होते. या रस्त्यावरून मार्गस्त होत असलेल्या नबाब पिंजारी, छब्बीर तडवी, भावेश महाजन, धीरज महाजनख् गजानन पाटील सह नागरिकांनी तातडीने या दोघ गंभीर जखमींना किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरिता दाखल केले. डॉ. मनीषा महाजन, सरदार कनाशा, मोहिनी धांडे, निलेश खंडारे आदींनी त्यांच्यावर प्रथमोउपचार केले. तरुणांना पुढील उपचारा करीता जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

खड्ड्यांमुळे अपघात
या राज्य मार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन खड्ड्यामुळे वारंवार अपघात घडत आहे.  अंकलेश्वर – बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


कॉपी करू नका.