येवती शिवारात अज्ञातांनी कपाशी कापून फेकली

0

जामठी : अस्मानी संकटातून वाचलेली कपाशी अज्ञातांनी चक्क बुंध्यापासून कापून फेकल्याचा खळबळजनक प्रकार येवती येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी शेतकर्‍याने बोदवड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताचा पोलिसांकडून शोध
येवती शिवारात अल्पभूधारक शेतकरी शब्बीर खा आलफ खा पठाण यांची गट क्रमांक 438 मध्ये शेती आहे. त्यांनी खरीप हंगामात कपाशीची पिकाची लागवड केली. कपाशी पिके चांगली तरारली असतांना अचानक झालेल्या पावसानंतर ते गुरूवारी शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना चक्क कपाशी पिके कापून फेकल्याचे दिसले.

 

नवीन फळधारणा झालेल्या कपाशी पिकावरील पिकावर एक एक झाडावर पन्नास ते साठ कैर्‍या पक्व झाल्या होत्या परंतु अज्ञातांनी या कपाशीच्या तब्बल पाव एकर क्षेत्रातील कपाशी कापणी करून नुकसान केले. शब्बीर खा आलफ खा पठाण यांनी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल केला.


error: Content is protected !!