भरधाव बसने बुलेटला उडवले : अमळनेरचे दोघे डॉक्टर मित्र जागीच ठार

0

Bullet fired by speeding bus: Two doctor friends of Amalner were killed on the spot अमळनेर : भरधाव बसने जोरदार धडक दिल्याने बुलेटवरील डॉक्टर असलेले दोन्ही मित्र जागीच ठार झाले. हा अपघात अमळनेर-बेटावद रस्त्यावरील हॉटेल माधवीजवळ घडला. डॉ. महेंद्र शांतीलाल बोरसे (39, रा.पाडसे, ता.अमळनेर) व डॉ. अरूण नथ्थू साळुंखे (38, रा. हिंगोण खुर्द ता. अमळनेर) अशी मयत झालेल्या दोन्ही डॉक्टरांची नावे आहेत.

बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
डॉ. महेंद्र बोरसे आणि डॉ. अरूण नथ्थू साळुंखे हे शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बुलेट क्रमांक (एम.एच.१८ ए.व्ही.३११) ने अमळनेर-बेटावद रस्त्याने शिरपूरकडे जात असताना ब्राम्हणे फाट्याजवळील हॉटेल माधवीजवळ समोरून येणारी शिरपूर-अमळनेर बस (एम.एच २० बी.एल ३९८१) ने बुलेटला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बुलेटवरील डॉ. महेंद्र बोरसे आणि डॉ. अरूण साळुंखे हे जागीच ठार झाले. ही बस दुसऱ्या बसला ओव्हरटेक करत असतांना हा भीषण अपघात झाला. अमळनेर ग्रामीण रूग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. याप्रकरणी रविंद्र मिस्तरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किशोर पाटील करीत आहे. दरम्यान पाडसे येथील डॉ.महेंद्र बोरसे हे परिसरात मनमिळाऊ असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पच्यात आई वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ तर त आई वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ तर अरुण साळुंके यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली असा परीवार आहे.


error: Content is protected !!