चाळीसगाव तालुक्यातील अल्पवयीन तरुणीवर आधी अत्याचार नंतर विष पाजून केला ठार मारण्याचा प्रयत्न


A minor girl in Chalisgaon taluka was first tortured and then tried to kill her by poisoning her चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्यानंतर तिच्यावर कपाशीच्या शेतात वारंवार अत्याचार करण्यात आला तसेच घटनेची वाच्यता कुणालाही पीडीतेने न करण्यासाठी तिला विष देवून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी राहुल वाल्मीक अहिरे याच्या विरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडीता उपचारार्थ दाखल
या प्रकरणी संशयीत राहुल अहिरे याच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात पीडीत मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरुन भादवी कलम 376. 373(2) (एन) (2)(जे), 307, 506 आणि लैंगिक गुन्हापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 चे कलम 4,3(ए), 4, 5,(एल)(आर) 6 आदि कलन्वय गुन्हां दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहेत. पीडितेस उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.