कंडारीत 35 वर्षीय महिलेचा विनयभंग

भुसावळ- फोटो काढण्याच्या बहाण्याने 35 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शहरालगतच्या कंडारी येथील नागसेन कॉलनीत बुधवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली. अमीन नावाच्या एका 25 वर्षीय युवकाने एका 35 वर्षीय महिलेचा फोटो काढण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर महिलेने युवकाच्या कानशीलात लगावत शहर पोलिस ठाणे गाठले. संशयीत आरोपी अमीनच्या विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय कंखरे पुढील तपास करीत आहे.


