जळगावात चारचाकीच्या धडकेत काका-पुतण्या ठार


जळगाव : भरधाव चारचाकीने दुचाकीला उडवल्याने झालेल्या अपघातात काका व पुतण्या यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी जैन पाईप कंपनी समोर घडली. महेश पोपट तायडे (32) व त्यांचा पुतण्या जयवंत उर्फ कृष्णा रातीलाल तायडे (14, दोन्ही रा.खडके रवंजा ता.एरंडोल) अशी मयतांची नाव आहेत. दोन्ही काका-पुतणे बांभोरी येथे महेश यांच्या बहिणीचे सासरे वारल्याने त्यांच्याकडे दुचाकीवरून जात असताना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास समोरून येणार्‍या अज्ञात चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले. दोघांचे मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. मयत महेश तायडे यांच्या पश्‍चात दोन भाऊ, दोन बहिणी, आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे.


कॉपी करू नका.