बोदवडमध्ये किराणा दुकान फोडले : 22 हजारांचा मुद्देमाल लंपास


बोदवड : शहरातील जामठी रोडवरिल किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 22 हजार रुपयांचा मुद्देमाल केला. जामठी रोडवरील ओम साई नाथ’ किराणा दुकान 19 रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील 21 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हे दुकान सुभाष नवलमल दोधाणी (65 रा.जैन मंदिरा जवळ प्रभाग क्रमांक 10, बोदवड) यांच्या मालकीचे आहे. नेहमीप्रमाणे रात्री 8.30 दरम्यान दोधाणी यांनी किराणा दुकानाचे व्यवहार आटोपून घर गाठले तर 20 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आलो असता दुकानाची शाळेकडील भिंत फोडून व दुकानाचे पत्रे वाकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील सहा हजार रुपये किंमतीच्या गुळाच्या भेल्या, तीन हजार 200 रुपयांचा 20 किलोची खोबरं वाटी कट्टा, 12 हजार रुपये किंमतीची किरकोळ सामान त्यात बिडी बंडल, वेलदोडे पाकीट असा एकूण 21 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत बोदवड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.


कॉपी करू नका.