भुसावळातील हुडको कॉलनीत चाकूहल्ला : वृद्धेसह दोघे नातवंड जखमी


Knife attack in Hudko Colony in Bhusawla : Old woman and two grandchildren injured भुसावळ : शहरातील श्रीनगर कॉलनी, हुडको कॉलनी भागात 70 वर्षीय वृद्धेवर चाकूहल्ला करण्यात आला तर वृद्धेला वाचवण्यासाठी आलेल्या दोघा नातवांनाही चाकू लागल्याने तेदेखील जखमी झाले. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. वृद्धेच्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी मयूर संजय अंभोरे (हुडको कॉलनी, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन हजार रुपये न दिल्याने हल्ला
तक्रारदार कमलबाई राममनोहर यादव (70, हुडको कॉलनी, श्रीनगर, भुसावळ) यांच्या घरी संशयीत मयूर अंभोरे हा मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आला व तुमचे पेन्शन झाल्याने पत्नीच्या सोनोग्राफीसाठी दोन हजार रुपये देण्याची मागणी केली मात्र वृद्धेने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने वृद्धेच्या डोक्यावर व उजव्या हातावर चाकूने हल्ला केला तसेच वृद्धेला वाचवण्यासाठी त्यांचे नातू अशरफ व मोईन यांनी धाव घेतल्यानंतर त्यांच्यावरही हल्ला करण्यात आल्याने तेदेखील जखमी झाले. या प्रकरणी कमलबाई यादव यांच्या फिर्यादीनुार आरोपी मयूर संजय अंभोरे (हुडको कॉलनी, श्रीनगर, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.