भुसावळात तरुणाचा मोबाईल लांबवताना भामट्याला रंगेहाथ पकडले


Bhamtya was caught red-handed while handing over the young man’s mobile phone in Bhusawal भुसावळ : तालुक्यातील हरताळे येथील तरुण भुसावळात कामानिमित्त आल्यानंतर परतीच्या प्रवासात घराकडे निघाला असता मेहकर बसमध्ये चढत असताना चोरटा ओप्पो कंपनीचा आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवत असताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात शेख सईद शेख रशीद उर्फ पेंटर (35, गौसीया नगर, भुसावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.

बसमध्ये चोरी करताना आरोपीला पकडले
हरताळे येथील बबलू सुनील साळवे (18) हा तरुण कामानिमित्त भुसावळात आल्यानंतर बुधवार, 7 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मेहकर बसमध्ये चढत असताना संशयीत शेख सईद शेख रशीद उर्फ पेंटर (35, गौसीया नगर, भुसावळ) याने साळवे यांच्या खिशातून मोबाईल काढला मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर आरोपीला प्रवाशांनी पकडत बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात सोपवले. या प्रकरणी साळवे यांच्या फिर्यादीनुसार शेख सईद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक तेजस पारीसकर करीत आहेत.


कॉपी करू नका.