सावदा शहरातील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा


Municipality’s hammer on encroachment in Sawada City सावदा : शहरातील नगरपरीषदेच्या वतीने गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात आली. बर्‍हाणपूर-अंकलेश्वर तसेच दुर्गामाता मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे प्रचंड फौजफाट्यासह जेसीबीद्वारे काढण्यात आल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले असून कारवाईत सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दुपारनंतर मोहिम गुंडाळली
टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्वच भागातील अतिक्रमणे हटविणार असल्याचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण म्हणाले. दरम्यान, गुरुवारी सकाळी सुरू झालेली अतिक्रमण मोहिम दुपारनंतर बंद करून गुंडाळण्यात आली तर शुक्रवार. 9 रोजी शहरात कोणतीही अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

स्वतःहून हटवली अतिक्रमण
व्यावसायीकांनी टपरीचे नुकसान न होण्यासाठी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली. मुख्याधिकारी किशोर चव्हाण, प्रशासकीय अधिकारी अनिल आहुजा, अविनाश पाटील, अरुण ठोसर, अविनाश गवले, हमीद तडवी, संजय माळी, आकाश तायडे, जितेश पाटील, भारती पाटील, अरुणा पारीख यांनी ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. यापुढे टप्प्या-टप्प्याने शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.


कॉपी करू नका.