ट्रॅक्टर उलटल्याने मजूराचा मृत्यू

वरणगाव : नागेश्वर मंदिराजवळील नाल्यात ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्याखाली दबल्याने मजुराचा मृत्यू झाला तर ट्रॅक्टर चालक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. चालक महेंद्र ठाकूर (वय 30) व मजूर दीपक कुंभार (25,दोघे रा.कवाडे नगर, वरणगाव) हे दोघे बोदवडकडून वरणगावकडे रीकामे ट्रॅक्टर-ट्रॉली (क्रमांक एम.एच.19 बी.ओ. 2402) घेवून येत होते. वळण रस्त्यावरील पुलाजवळ ट्रॅक्टरच्या पुढील चाक नादुरुस्त झाल्याने ट्रॅक्टर नाल्यात कोसळून पलटी झाले. यावेळी ट्रॅक्टरवर बसलेला मजूर दीपक कुंभार हा त्या ट्रॅक्टरखाली दाबला गेल्याने तो जागीच ठार झाला.


