शेंदूर्णीत माथेफिरू तरुणाने पोलिस चौकी जाळली

शेंदुर्णी : माथेफिरू तरुणाने पोलिस चौकीच पेटवल्याची घटना शनिवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. समाधान बळीराम पाटील असे या माथेफिरू तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान या तरुणाने पोलिस चौकी का जाळली? याचे कारण अद्याप समोर आलेली नाही. समाधान पाटील या तरुणाने शनिवारी सकाळी अचानक पेट्रोलचा कॅन पोलीस चौकीत घेऊन जाळून टाकायला सुरुवात केली. या आगीत पोलीस चौकीतील अनेक महत्वाची कागदपत्र, फाईल्स आणि साहित्य साहित्य जळून खाक झाले. याप्रकरणी संशयित आरोपी समाधान पाटील याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


