शिरपूर तालुका पोलिसांनी उद्ध्वस्त केला बनावट दारूचा कारखाना


पळासनेर : बनावट दारू बनवण्याचा कारखाना शिरपूर तालुका पोलिसांनी रविवारी मध्यरात्री छापा टाकून नष्ट केला. पळासनेर येथील भीमा गुलाब भील याच्या घरात पोलिसांना 200 लिटर व 36 लिटरच्या टाक्यांमध्ये स्पिरीट, देशी-विदेशी कंपनीची बनावट दारू, रीरकाम्या बाटल्या मिळून 61 हजार 124 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले तर संशयीत पसार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दिलीप बाविस्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भीमा गुलाब भीलविरुद्ध शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कॉपी करू नका.