श्री लक्ष्मण चैतन्य बापू पुण्यतिथी महोत्सवास 23 पासून सुरुवात

देशभरातून हजारो चैतन्य साधकांची लागणार हजेरी : जय्यत तयारी अन् प्रशासन यंत्रणा सज्ज
रावेर : भक्ति, ज्ञान तथा प्रेमावतार व अखिल भारतीय चैतन्य साधक परीवाराचे प्रणेते आणि श्री वृंदावन धाम आश्रमाचे संस्थापक प.पू.सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या 10 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त देशभरातून हजारो साधकांची दरवर्षाप्रमाणे यंदाही 23 डिसेंबरपासून सुरू होणार्या तीन दिवसीय नामजप साधना शिबिरात उपस्थिती राहणार आहे. या भव्य व दिव्य पुण्यतिथि महोस्त्वाच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.
संत-महंतांचीही राहणार उपस्थिती
25 डिसेंबरला होणार्या कार्यक्रमात हजारो साधकांसह शेकडो संत, महंत, महामंडलेश्वरांची उपस्थिती राहणार आहे. त्यात सतपंथ फैजपूरचे महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, स्वामी नारायण गुरुकुल सावदा येथील महंत भक्तिप्रसाद शास्रीजी महाराज, सावदा येथील संत श्री मानकर बाबाजी शास्री, दत्त आश्रम डोंगरदेचे स्वामी श्री स्वरूपानंदजी महाराज, बर्हाणपूर सांडसचे संत श्री सरसपुरी जी महाराज, राम मंदिर कुसुंबाचे महंत श्री भरतदास जी महाराज, मध्यप्रदेश खलघाट धामनोदचे महंत श्री कृष्णदासजी महाराज, नंदुरबार-प्रकाशा येथील साध्वी कमल माताजी, कैलाश धाम झिरन्या (म.प्र) चे महंत श्री राघवानंद भारतीजी महाराज, सांबरपाट जीन्सीचे महंत श्री गणेश गिरीजी महाराज, चाळीसगांवचे संत श्री विशुद्धानद शास्रीजी महाराज, रामदेवबाबा मंदिर भगवान पूरा (म.प्र) येथील महंत श्री रामदास त्यागीजी महाराज, हनुमान आश्रम सतवाड़ा (म.प्र) येथील महंत श्री संतोष दासजी महाराज, शक्तिधाम मारूगढ़चे श्री विष्णु महाराज आदी संतांची उपस्थिती राहणार आहे.
तीन दिवसीय नाम जप साधना शिबिर
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या रावेर तालुक्यातील पाल या आदिवासी परीसरात प.पू.सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींनी ज्ञान, भक्ति, तथा प्रेमाची अविरत गंगा वाहून देशभरातील साधक या ज्ञान गंगेत डुबकी लावत भवसिंधु पार करीत आहेत. नियतीच्या आदेशाचे पालन करीत 25 डिसेंबर 2009 साली ब्रम्हलीनास समाधीस्त झाले. तेव्हापासून पुज्य बापूजींच्या पुण्यतिथी महोत्सवाचे अखिल भारतीय चैतन्य साधक परीवारातर्फे भव्य आयोजन करण्यात येते. या तीन दिवसीय नामजप साधना शिबिरासोबत सोमवार, 23 डिसेंबर रोजी येथील राजस्थानी कलाकृतीने श्री हरीधाम मंदिर वर्धापन दिवस तसेच मंगळवार, 24 डिसेंबर रोज ीपुज्य बापूजींचे गुरुवर्य सदगुरु संत श्री महादेव चैतन्य उर्फ (दगडूजी) बापू जयंती आणि शेवटी बुधवार, 25 डिसेंबर रोजी सदगुरु प.पू.संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या दिवशी सकाळी पाच वाजेला पुज्य बापूजी समाधी दर्शन तसेच महाआरती, पादुका पूजन, त्यानंतर गुरुदीक्षा व सकाळी 09.30 पासून आलेल्या संताचे श्रद्धावचन आणि पुज्य बापूजींचे कृपापात्र शिष्य विद्यमान गादीपती श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या रसाळ अमृत वाणीतून सत्संग अमृताचा लाभ तसेच महाप्रसादानतर या महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. कार्यक्रमाकरीता पोलिस प्रशासन, महावितरण, आरोग्य विभाग, आगार प्रमुख यांना सज्जतेसाठी निवेदन देण्यात आले आहे. आश्रमात भाविकांच्या व्यवस्थेकरीता सत्संग पंडाल, निवास,भोजन, स्नान आदींच्या तयारीला साधकांतर्फे सुरवात करण्यात आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन चैतन्य साधक परीवार व रावेर तालुका समितीतर्फे करण्यात आले आहे.


