यावलसह शहर मोर्चाने दणाणले

नागरीकत्व कायद्याला विरोध : कायद्याआडून आरक्षण संपवण्याचे षडयंत्र -जगन सोनवणे
यावल : नागरीकत्व कायद्याला विरोध दर्शवत शनिवारी यावलमध्ये तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. प्रसंगी नागरीकत्व कायद्याला विरोध दर्शवण्यात आला. केंद्र शासनाने मंजूर केलेला नागरीकत्व कायदा व एनआरसी कायदा हा नुसत्या मुस्लिम समाजासाठी अडचणीचा नाही तर देशातील तमाम अनुसुचित जाती/जमाती, ओबीसी सह आरक्षणामध्ये येणार्या सर्व जमातीला त्याचा धोका आहे. यात ‘हिंदू’ म्हणुन नोंदणी केल्यावर आरक्षण संपुष्टात येईल हे मोठे षड्यंत्र केंद्र सरकारचे आहे, असा आरोप पीआरपीचे जगन सोनवणे यांनी केला. ते यावलमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित करताना बोलत होते. मोर्चात सुमारे पाच हजार सर्वधर्मीय बांधव सहभागी होते. यात मुस्लिम बांधवांची संख्या अधिक होती.
यावलमध्ये सर्वधर्मीय एकवटले
आठवडे बाजारात शनिवारी नागरीकत्व कायदा व एनआरसी कायद्याविरूध्द सर्व धर्मीय बांधव एकवटले होते. यात मुस्लिम समाज बांधवांची संख्या अधिक होती. शनिवारी सकाळी नऊ वाजता आठवडे बाजारामध्ये सभाघेण्यात आली यात पीआरपीचे जगन सोनवणे यांनी सांगीतले की, मुस्लिम समाजापेक्षा हे दोन्ही कायदे हिंदू धर्मातील अनुसुचित जाती, जमाती, ओबीसींसह आरक्षीत प्रवर्गा करीता अधिक धोकेदायक या कायद्याच्या आडून आरक्षण संपण्याचे षडयंत्र आहे. हे तमाम हिंदु, आदिवासी समाज बांधवांनी समजुन घेेतले पाहिजे व त्यांनीदेखील या करीता विरोध दर्शवण्याकरीता एकवटले पाहिजे, आवाहन करीत केंद्र सरकारवर त्यांनी कडाडून टिका केली.
यांनी केले मार्गदर्शन
यावेळी हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, प्रभाकर सोनवणे, रऊफ खान, भगतसिंग पाटील, हाजी याकुब शेख, शेख अझरुद्दीन शेख समशोद्यीन, कदीर खान, अशपाक शाह, मो. शफी शेख, शेख कलीम शेख रफीक, मो.तैफुर कादरी, सय्यद ताबीश अली आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता हा मोर्चा शहरातील सुदर्शन चौक, बाबूजी पुरा, मार्गे मेन रोड, खिर्णीपुरा, बुरूज चौकातून थेट तहसील कार्यामध्ये धडकला. येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आले.
यांचे मोर्चा यशस्वीतेसाठी परीश्रम
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक अताऊल्ला खान, हाजी हकीम खाटीक, शेख निजामुद्दीन कदरोद्यीन, मो.हकीम मो.याकुब, शेख अल्ताफ शेख समद, आसीफ खान दिलावर खान, शेर खान जुबेर खान, करीम अ. रज्जाक मन्यार, उस्मान खान इब्राहीम खान, शेख कलीम शेख याकुब, मोहसीन खान गफूर खान, शेख नसरुद्दीन शहाबुद्दीन, शेख नईम शेख शरीफ, शेख असिफ शेख शरीफ, गुलाम रजा इकबाल खान, शेख अक्रम शेख ताहेर, सय्यद परवेज खान शकील खान, सय्यद तनवीर सय्यद अकबर, शेख अन्वर शेख सिराज,अनिल जंजाळे सह आदींनी परीश्रम घेतले. मोर्चा शांततेत पार पाडावा म्हणुन फैजपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे, उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, सुनीता कोळपकरसह कर्मचार्यांनी बंदोबस्त ठेवला.


