भुसावळात एकाला लुटले : आरोपीला अटक


भुसावळ : नाहाटा चौफुलीकडे पायी जात असलेल्या इसमास तीन इसमांनी मारहाण करीत लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. समीर शेख शरीफ शेख (21, रा.दिनदयाल नगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. फिर्यादी सागर सुभाष बारगळल (26, रा.मुंडवाडी, ता.कन्नड, जिल्हा औरंगाबाद) हे आपल्या गावी जाण्यासाठी 21 रोजी पहाटे 5.30 वाजता भुसावळ शहरातील नाहाटा चौफुलीकडे पायी जात असताना तीन अज्ञात इसमानी फिर्यादीजवळील सहा हजार रुपये किंमतीचा Mi कंपनी चा मोबाईल तसेच 1700 रु रोख असे मारहाण करून चाकुचा धाक दाखवून हाॅटेल हेवनच्या बाजुच्या गल्लीत नेऊन जबरीने हिसकावून घेतले होते. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर पो.काॅ. विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, उमाकांत पाटील, दिनेश कापडणे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी आरोपीला अटक केली. दरम्यान अन्य दोन पसार आरोपींचा कसून शोध सुरू आहे. सहा.पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.

कॉपी करू नका.