जळगावसह भुसावळातील चोर्‍यांचा उलगडा : पाच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव : जळगावसह भुसावळ शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांचे शोरूम फोडल्याप्रकरणी दोन अल्पवयीन व तीन सज्ञात अशा एकूणच पाच आरोपींच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मुसक्या आवळल्या आहेत. सोनू नागल मोहिते (21), बादल हिरालाल जाधव (25, दोघे रा.विटवा, ता.बोदवड), राहुल कमल मोहिते (20, रा. इंदूर) व अन्य दोन अल्पवयीन आरोपींमध्ये समावेश आहे.

जळगावसह भुसावळात आरोपींनी केल्या चोर्‍या
आरोपींनी 25 नोव्हेंबरला रात्री तरसोद परिसरातील सरस्वती फोर्डमध्ये चोरीचा प्रयत्न मात्र घबाड त्यांच्या हाती न लागल्याने याच रात्री भुसावळ शहरातील होंडा, हीरो व डिस्को टॉवर हे तीन शोरूम फोडले. तिन्ही ठिकाणाहून त्यांनी लाखो रुपयांची रोकड लांबवली होती तर 17 डिसेंबर रोजी रात्री जळगाव एमआयडीसीतील मानराज मोटर्स फोडून चार लाख, याच रात्री पंकज ऑटो शोरूम फोडून 9 हजार, 20 डिसेंबर रोजी महिंद्रा शोरूम फोडून एक लाख 51 हजार रुपयांची रोकड लांबवली. या टोळीने अवघ्या 27 दिवसांत जळगाव, भुसावळातील वाहनांचे आठ शोरूम फोडले आहेत.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम, रवींद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अनिल जाधव, कमलाकर बागुल, दीपक पाटील, अशरफ शेख, दादाभाऊ पाटील, दर्शन ढाकणे, अशोक पाटील, वैशाली सोनवणे, अशोक महाजन, नरेंद्र वारुळे, विजय देवराम पाटील, शरीफ काझी, गफूर तडवी यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


कॉपी करू नका.