रस्ता काँक्रिटीकरणाचे बांधकाम गटारीच्या उंचीपर्यंत करा


मुक्ताईनगरात शिवसेना आक्रमक : काम अखेर पाडले बंद

मुक्ताईनगर : शहरातून सुरू असलेल्या एमएसआरटीसी रस्ते काँक्रिटीकरण बांधकाम आधी करण्यात आलेल्या गटारीच्या उंचीपर्यंत करावे, अशी मागणी  शिवसेनतर्फे करण्यात आली. वेळीच दखल न घेतल्यास काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला. गटारीपेक्षा सात ते आठ इंच रस्ता खाली गेल्याने शहरातील संबंधित दुकानात मोटारसायकली इतर वाहने चढणार नसल्याने प्रचंड वाहतुकीची कोंडी होईल व भविष्यात हा विषय भयंकर अडचणीचा ठरणार आहे. या संदर्भात मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे दोन वेळा निवेदन देण्यात आले होते मात्र याबद्दल प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात न आल्याने या क्षणाला आम्ही सुरू असलेले काम बंद करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई, जिल्हा नियोजन समिती सदस्य मनोहर खैरनार, गोपाळ सोनवणे, शहरप्रमुख राजेंद्र हिवाळे, प्रशांत टोंगे, वसंता भलभले, बाळा बालशंकर, पिंटू पाटील, महिंद्रा मोंढाळे, अमर पाटील, पंकज राणे, पंकज पांडव, सतीश नागरे, नामदेव मोरे, स्वप्नील श्रीखंडे, शुभम शर्मा, आकाश सापधरे, योगेश पाटील, नितीन कांडेलकर, पप्पू मराठे, सुनील पाटील व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.1


कॉपी करू नका.