राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पधैत जयम भारवानी भारतातून चतुर्थ


भुसावळ : राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पधैत जयम भारवानी भारतातून चतुर्थ चंदीगडला राष्ट्रीय स्तरावर झालेल्या शरीर सौष्ठव स्पधैत भुसावळातील जयम भारवानी या खेळाडूने 90 किलो गटात चतुर्थ क्रमांक पटकावला. नुकत्याच चंदीगड येथे ऑल इंडीया नॅशनलाईज चंदीगड युनिव्हसिटीतर्फे नॅशनल शरीर सौष्ठव स्पर्धा झाल्या. या स्पधेत गुजराथ, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, हरीयाणा, मध्यप्रदेश, ओडीसा, छत्तीसगड या सर्व राज्यातील भारतातून 400 स्पर्धक आले. यात विविध गटात स्पर्धा झाल्या. त्यात भुसावळातील जयम भारवाणी हा भारतातून चौथ्या क्रमांकावर 90 किलो वजनी गटात आला. त्याला सर्टीफिकेट मिळाले. जयम हा राजकुवर कॉलेज, फर्दापूरचा विद्यार्थी असून तो डॉ.बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी औरंगाबादतर्फे खेळला. त्याला मिस्टर वर्ड अनूज कुमार तालीयान यांचे मार्गदर्शन लाभले तर दीपक रोहिकर, शुभम पवार, शाहबाज खान, डॉ.राजेश सिंग, राकेश यादव, श्रेयस मोरे, अन्वर खान यांचे सहकार्य लाभले.


कॉपी करू नका.