वरणगावात तालुका व जिल्हास्तरीय केसरी कुस्ती निवड चाचणी उत्साहात


महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेसाठी 14 मुलींसह 20 मुलांची निवड

वरणगाव : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेच्या मान्यतेने जळगाव जिल्हास्तरीय केसरी कुस्तीची निवड चाचणी नुकतीच महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणावर घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून वरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील काळे व चंद्रकांत बढे यांच्या हस्ते हनुमान मूर्तीचे पूजन करून आखाड्यात श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत 14 मुली व 20 मुले यांची निवड करण्यात आली. कुस्तीपटू 7 जानेवारी रोजी राज्यस्तराव खेेळणार आहेत. यावेळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, वरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील काळे, सहकार मित्र चंद्रकात बढे, उपनिरीक्षक हर्षल भोये, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, नगरसेवक गणेश चौधरी, रवींद्र सोनवणे, अल्लाउद्दीन शेठ, जिल्हा कुस्ती सचिव सुनील देशमुख, आश्रयदाते तात्यासाहेब गुलाबराव देशमुख, सुधाकर जावळे, मुख्याध्यापक राजेंद्र वाघ, नामदेव मोरे, प्रशांत निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

यांची कुस्तीपटूंची झाली निवड
महाराष्ट्र केसरीसाठी निवडण्यात आलेले पहेलवान असे- महिला- गादी गटविभाग- कुणाली पाटील (चाळीसगाव), मंदिनी महाजन (एरंडोल), कामिनी पाटील (चोपडा), पल्लवी कुंभार (पाचोरा), ज्योती यादव (एरंडोल), माया झोड (पाचोरा), दीपाली मोरे (चाळीसगाव), ज्युनियर गट- प्रिया पाटील (चाळीसगाव), माया महाजन (एरंडोल), नेहा जाधव (चाळीसगाव), निकिता सोनवणे (चाळीसगाव), वैष्णवी शर्मा (चाळीसगाव), प्रेरणा मराठे (एरंडोल), योगेश्वरी मराठे (एरंडोल). कुमार गटात- हर्षल पाटील (चाळीसगाव), सागर महाजन (भडगाव), विशाल पाटील (भडगाव), राजेश ढगे (चाळीसगाव), शाहेद शब्बीर (वरणगाव), गोविंदा गवळी (चाळीसगाव), गणेश गवळी (चाळीसगाव), निजाम अली सैय्यद (अमळनेर), करण देवरे (चाळीसगाव), भावेश पाटील (चाळीसगाव), माती विभाग- यश मराठे (जळगाव), समाधान पाटील (पारोळा), सोपान माळी (चाळीसगाव), अनिल पवार (चाळीसगाव), गणेश गायकवाड (चाळीसगाव), श्रीराम भोई (वरणगाव), सतीष पाटील (चाळीसगाव), मुस्ताक कुरेशी (पाचोरा), गोपाळ जाने (चाळीसगाव), प्रवीण देशमुख (पाचारो), गादी विभाग- सागर महाजन (भडगाव), राज वाकोडे (भडगाव), जगन्नाथ वाकोडे (भडगाव), अमोल चौधरी (पारोळा), अब्दुल मुतलीब (भुसावळ), गोकुळ साबळे (चाळीसगाव), दिनेश पाटील (पाचोरा), सागर चौधरी (पारोळा), हितेश पाटील (पाचोरा), अतुल पाटील (चाळीसगाव) यांची निवड झाली . जिल्हास्तरीय चाचणी घेण्याची संधी वरणगावला प्रथमच प्राप्ती झाली

राज्य स्तरावरील पंचानी पाहिले काम
या निवड चाचणीसाठी कुमार गट, प्रौढ गट तसेच मुली तसेच यात माती गट व गादी गटांच्या कुस्त्याची चाचणीची निवड पंचकमेटी अजय देशमुख, गुलाबराव चव्हाण, संजय पाटील, पी.पी.पाटील, युवराज भोसले, एस.के.पाटील, दिलीप संगीले, सोपान पाटील, भानुदास आकरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन महेश सोनवणे तर आभार भैया सोनवणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी वरणगाव हनुमान व्यायमशाळेचे अध्यक्ष नामदेव मोरे, उपाध्यक्ष सुपडू सोनवणे, एकनाथ भोई, रामदास माळी, सरचिटणीस प्रशांत निकम, गुलाबराव देशमुख, शेख इस्माईल, संजय बावस्कर, शकील शेख, दिलीप मराठे, इफ्तेखार मिर्जा, दिनेश देशमुख, इच्छा राम पहेलवान, संतोष चौधरी, मनोज भोई आदी कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.