भोळे कॉलेजच्या खेळाडूंची अ.भा.आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड


भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील खेळाडू अनिल सपकाळे व विशाल पटेल यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ बॉक्सिंग संघात निवड झाली. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी त्यांचा पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी प्रा.डॉ.संजय डी.चौधरी, प्रा.बी.एन.पाटील, प्रा.डॉ .आर.बी.ढाके उपस्थित होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतर विभागीय बॉक्सिंग स्पर्धा, शिरपूर येथे अनिल सपकाळे याने 52 किलो ग्रॅम गटात व विशाल पटेल याने 60 किलो ग्रॅम गटात विजय मिळवुला. या खेळाडंची 25 ते 31 डिसेंबर दरम्यान अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा, बागपथ, मेरठ विद्यापीठ, दिल्लीसाठी निवड झाली आहे. सोमवारी ते रवाना झाले. या निवडीबद्दल सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी क्रीडा समिती सदस्य प्रा.अनिल सावळे, प्रा.डॉ.आर.एम.सरोदे, डॉ.भारती बेंडाळे यांनी अभिनंदन केले असल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.


कॉपी करू नका.