हिराबेन मोदी पंचत्वान विलीन : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला मुखाग्नी


Hiraben Modi Panchatwan Merger : Prime Minister Narendra Modi gave Mukhagni अहमदाबाद : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी सकाळी अहमदाबादच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. मोदी यांनी गांधीनगरमध्ये हिराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिल्यानंतर स्मशानभूमीत मुखाग्नी देत अंत्यसंस्कार केले. हिराबेन यांनी शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला.

उपचारादरम्यान खालावली प्राणज्योत
गुरुवारी मध्यरात्री अचानक हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हिराबेन मोदी यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परीवार आहे.


कॉपी करू नका.