भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय परीषद

भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय परीषदेचे सोमवारी आयोजन करण्यात आलेले होते. या परीषदेत सुमारे 130 संशोधक प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थी सहभागी झाले. प्रसंगी 60 संशोधकांनी आपल्या शोधनिबंधांचे वाचन केले. परीषदेत संगणक व माहिती तंत्रज्ञानातील नवीन विचार प्रवाह या विषयावर सखोल असे विवेचन संशोधकांनी केले.
यांची परीषदेला प्रमुख उपस्थिती
उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी रजिस्ट्रार प्रा.डॉ.बी.व्ही.पवार यांनी केले. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक होते. प्रमुख पाहुणे म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक , सचिव विष्णू चौधरी कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, सिनेट सदस्य प्रा.ई.जी.नेहेते, व्याख्याता स्कूल ऑफ कॉम्पुटर सायन्स एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठ , पुण्याचे विभागप्रमुख डॉ.चंद्रशेखर पाटील, डाटा इंजिनिअरींग अॅण्ड अनॉलीसीस विभागप्रमुख संजय झोपे (यु.एस.), संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे व परीषदेचे सचिव प्रा.हर्षल वि.पाटील यांची उपस्थिती होती. परीषद एकूण चार सत्रात झाली.
चार सत्रात परीषद
प्रथम सत्रात प्रा.डॉ.चंद्रशेखर पाटील यांचे बीजभाषण सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत झाले. द्वितीय सत्रात संजय झोपे यांचे बीजभाषण सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत झाले. डाटा अनालीसीस या विषयावर पॉवर पॉईंटच्या सहाय्याने त्यांनी मार्गदर्शन केले. तिसरे सत्र एक ते चार वेळेत झाले. संशोधक शोधनिबंधांचे वाचन त्यात करण्यात आले. चौथे व परीषदेचे समारोपाचे शेवटचे सत्र दुपारी 4.30 ते 5. 00 या वेळेत झाले. यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी परीषदेचे संयोजक उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच. बर्हाटे उपस्थित होते.
यांनी घेतले परीश्रम
या संपूर्ण परीषदेचे संयोजक उपप्राचार्य व संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. बी.एच.बर्हाटे, परीषदेचे सचिव प्रा.हर्षल वि.पाटील तर परीषदेचे विद्यार्थी सचिव अपूर्वा बी.बर्हाटे, मेघा चौधरी, प्रा.डॉ.जी.आर.वाणी, प्रा.डॉ. गौरी पाटील, प्रा.स्वाती फालक, प्रा.पूनम महाजन, आशिष वि.चौधरी, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.जयंत बेंडाळे, प्रा.तुषार पाटील, प्रा.डॉ.उमेश फेगडे, प्रा.सचिन कोलते, प्रा.अर्चना भालेराव, प्रा.वैशाली वाय.पाटील, प्रा.स्वप्नाली वाघुळदे, प्रा.वैशाली अ.पाटील, प्रा.संजीवनी वाघ, प्रा.लुब्धा बेंडाळे, प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा.खुशबू भोळे, प्रा.रीया अग्रवाल, चुडामण कोले, सहदेव तायडे, किशोर नारखेडे, मनीष दलाल, नितीन जोशी, विलास जावळे यांनी परीश्रम घेतले.


