कोटेचा महिला महाविद्यालयात माजी विद्यार्थिनींचा 26 रोजी मेळावा

भुसावळ : शहरातील श्रीमती प. क कोटेचा महिला महाविद्यालयात गुरुवार, 26 रोजी माजी विद्यार्थिनींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रारंभी सकाळी दहा वाजता माजी विद्यार्थी संघटनेच्या सभासदांची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. मेळाव्याप्रसंगी माजी विद्यार्थिनींसाठी विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी विद्यार्थिनींसाठी चहा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून सर्व माजी विद्यार्थिनींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा तसेच कोटेचियन्स माजी विद्यार्थी संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.


