पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ख्रिसमस व न्यू इयर उत्साहात

भुसावळ : पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्येही ख्रिसमय व न्यू इयर सण उत्साहात साजरा करण्यात आला. सांताक्लेजचा पेहराव धारा वर्मा यांनी करीत लक्ष वेधले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी येशूच्या जन्मावर आधारीत नाटिका सादर केली. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थनागीत म्हटले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी जीजस क्राइस्ट यांच्या जन्मावर आधारीत लघू नाटिका व ‘कॅरेल साँग’ सादर केले. नाटिकेचे मार्गदर्शन एस्तर विन्सिंट आणि रेखा मुळे यांनी केले. नाटिकेचे नॅरेशन वेदश्री राणे व रुजुता भोळे या विद्यार्थिनींनी केले. इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून येणार्या नवीन वर्षाचे स्वागत केले. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थीनींनी परीचा पेहराव करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. ख्रिसमस ट्री, वर्ग व शाळेचा परीसर सजवून विद्यार्थ्यांनी नाताळच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.प्राचार्य विनयकुमार उपाध्याय यांनी शांतीचा संदेश देणार्या नाताळ सणानिमित्त व नवीन वर्षाच्या शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांना केक व चॉकलेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे व्यवस्थापक रामदास कुलकर्णी, सीमा पाटील, नीलम अग्रवाल, वंदना नाईक, प्रकाश दलाल तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


