ग्राहकाने जागरूक असणे गरजेचे : तहसीलदार उषाराणी देवगुणे


रावेर : प्रत्येक व्यक्ती हा कुठे ना कुठे ग्राहक असतो, बाजार पेठेतील वस्तू किंवा सेवा खरेदी करतांना ग्राहकाने जागरूक असणे गरजेचे आहे. संबधीत दुकानदारांकडून बिलाची पक्की पावती घेणे आवश्यक आहे जर फसवणूक झाल्यास आपण घेतलेल्या बिलाच्या आधारावर न्याय मिळवण्यास मदत होते, असे प्रतिपादन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी ग्राहकांची कशी फसवणूक केली जाते यासाठी ग्राहकांनी काय केले ? पाहिजे ग्राहक दिन का साजरा केला जातो? यावर विविध ग्राहक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी कार्यक्रमाला साहित्यीक अ.फ.भालेराव, तहसीलदार उषाराणी देवगुणे, अ‍ॅड.धनराज पाटील, डॉ.गुलाब पाटील, अ‍ॅड.एम.ए.खान, दिलीप कांबळे, बाळु शिरतुरे, मनिष नाईक, नायब तहसीलदार सी.जी.पवार, शारदा चौधरी, शिक्षिका ई.बी.नाईक, शिरीष वाणी, डॉ.संगीता महाजन, पुरवठा अधिकारी अतुल नागोरभोजे, वजन माप निरीक्षक एस.आर.खैरनार, क्षेत्र सहाय्यक एस.आर.सुरवाडे, एस.एल.लोहार, शैलेंद्र तरसोदे, डी.डी.वाणी, योगेश पाटील, अशोक महाजन आदी शासकीय कर्मचारी महिला व ग्राहक उपस्थित होते. सूत्रसंचलन विजय पाटील यांनी केले.

अन्यथा ग्राहकांनी तक्रार मंचात जावे
ग्राहकांची वस्तू खरेदी करतांना फसवणूक झाली असल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी ग्राहक तक्रार मंच यांच्या दालनात तक्रार करावी व आपली कशी फसवणूक झाली आहे हे न्यायालयात मांडावे. आपल्या तक्रारीत काही तथ्य असल्यास आपल्याला त्याची नुकसान भरपाई मिळते, असे प्रतिपादन साहित्यीक अ.फ.भालेराव यांनी केले.


कॉपी करू नका.