रेल्वेत आता केवळ 139 व 182 क्रमांक राहणार कार्यरत

भुसावळ : भारतीय रेल्वेत प्रवाशांच्या तक्रारी संदर्भात विविध क्रमांक सुरू करण्यात आले होते मात्र यापुढे केवळ प्रवाशांना हेल्पलाईनसाठी 182 शिवाय रेल्वे सुरक्षा बलाची मदत मिळवण्यासाठी 139 क्रमांक सुरू राहणार असून अन्य क्रमांक नवीन वर्षात बंद करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. नवीन वर्षात 1 जानेवारी 2020 पासून 139 व 182 क्रमांक सोडून खानपान सेवेसाठी असलेला क्रमांक 1800111321, दुर्घटना घडल्यानंतर सुरक्षा उपायांसाठी असलेला 1072 तसेच संदेश तक्रारींसाठी असलेला 9717630982, सामान्य तक्रारींसाठी असलेला 138, सतर्कता क्रमांक 152210 तसेच क्लीन माय कोच क्रमांक 58888/138 बंद करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. या संदर्भात प्रवाशांनी दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


